1971 साली झालेल्या निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेशातील काकीनाडा येथील कॉंग्रेसचे उमेदवार एम. एस. संजीवराव यांनी सर्वाधिक मताधिक्य मिळवत आपल्या प्रतिस्पर्ध्यावर 2,92,926 मतांची आघाडी मिळवली होती.
1977 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये बिहारमधील हाजीपूर मतदारसंघातून भारतीय लोकदलाचे नेते रामविलास पासवान यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर 4,24,545 मतांची आघाडी घेत देशात सर्वाधिक मताधिक्य मिळवण्याचा मान पटकावला होता.
1980 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेशातील रेवा मतदारसंघात अपक्ष म्हणून निवडणूक लढवलेल्या महाराजा मार्तंड सिंग यांनी 2,38,351 मतांची आघाडी घेत सर्वाधिक मताधिक्य मिळवले होते. 1984 च्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी
मतदारसंघातून राजीव गांधी यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 314878 मतांनी पराभव करत देशात सर्वाधिक मताधिक्य मिळवणारे उमेदवार ठरले.
1977 प्रमाणेच 1989 मध्येही हाजीपूर मतदारसंघातून जनता दलाचे उमेदवार रामविलास पासवान यांनी प्रतिस्पर्ध्यावर 504448 मतांची आघाडी मिळवत अव्वल स्थान पटकावले.
1991 मध्ये त्रिपुरा या छोट्या राज्यातील कॉंग्रेसचे उमेदवार संतोष मोहन देव यांनी आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवारावर 428984 मतांची आघाडी मिळवत मताधिक्यातील पहिला क्रमांक मिळवला.