5वी एसपीजे कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धा
पुणे – अर्न्स्ट अँड यंग संघाने हार्मन संघाचा 91 धावांनी पराभव करत येथे होत असलेल्या सत्य प्रकाश जोशी ग्रुप यांच्या तर्फे 5व्या एसपीजे करंडक कॉर्पोरेट टी-20 क्रिकेट स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
व्हेरॉक क्रिकेट मैदान व लेजेंड्स क्रिकेट अकादमी मौदान येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत कर्णधार चिन्मय जोशीच्या अष्टपैलू कामगिरीच्या बळावर अर्न्स्ट अँड यंग संघाने हार्मन संघाचा 91 धावांनी दणदणीत पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.
पहिल्यांदा खेळताना अर्जुन शिंदे व चिन्मय जोशी यांच्या प्रत्येकी 62 धावांसह अर्न्स्ट अँड यंग संघाने 20 षटकांत 6 बाद 183 धावा केल्या. 184 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आकाश जाधव व चिन्मय जोशी यांच्या अचूक गोलंदाजीपुढे हार्मन संघ केवळ 15.1 षटकांत सर्वबाद 92 धावांमध्येच गारद झाला. त्यामुळे त्यांना 91 धावांनी पराभूत व्हावे लागले. यावेळी 31 चेंडूत 62 धावा व 15 धावांत 2 गडी बाद करणारा चिन्मय जोशी सामनावीर ठरला.
तर, दुसऱ्या लढतीत अरविंद चौहानच्या अष्टपैलू कामगिरीसह वेंकीज् संघाने ऍमेझॉन संघाचा 69 धावांनी पराभव केला. यावेळी वेंकीजच्य संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 8 बाद 207 धावांची मजल मारली होती. यावेळी वेंकीजच्या अभिनव पुरीने 78 तर अरविंद चौहानने 33 धावांची खेळी करत संघाला 207 धावांची मजल मारुन देत ऍमेझॉनसंघासमोर विजयासाठी 208 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना ऍमेझॉन संघाला 18.4 षटकांत सर्वबाद 138 धावांचीच मजल मारता आल्याने त्यांना 69 धावांनी पराभव स्विकारावा लागला. यावेळी अरविंद चौहानला अष्टपैलू कामगिरी बद्दल सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
सविस्तर निकाल –
साखळी फेरी – अर्न्स्ट अँड यंग- 20 षटकांत 6 बाद 183 (अर्जुन शिंदे 62, चिन्मय जोशी 62, राहुल प्रसाद 21, शाहरुख कलमानी 2-43, निशांत खंडागळे 2-24, हरेंद्र यादव 2-38) वि.वि हार्मन- 15.1 षटकांत सर्वबाद 92 (जस्मित सिंग 24, मयुर बागमार 18, आकाश जाधव 3-15, चिन्मय जोशी 2-15).
वेंकीज्- 20 षटकांत 8 बाद 207 (अभिनव पुरी 78, अरविंद चौहान 33, अमित सिंग 27, शिवराज मुळीक 3-40, रोहित कांबळे 2-31, विवेक विश्वकर्मा 1-30, अनिर्बन बॉनर्जी 1-27, प्रशांत शर्मा 1-28) वि.वि अमेझॉन- 18.4 षटकांत सर्वबाद 138 (शशांक कश्यप 50, रोहित कांबळे 31, रोहित गुंड 3-3, अरविंद चौहान 2-13, मयुर टिंगरे 2-8).