मारहाण करीत तरुणाला लुटले

पिंपरी -मारहाण करत तरुणाला लुटल्याची घटना भूमकर चौक हिंजवडी येथे घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. हनुमंत महादेव खोत (वय-28 रा. ताथवडे) यांनी फिर्याद दिली असून दोन अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खोत हे भूमकर चौक येथून सर्व्हिस रोड वरून पायी जात असताना दोन अज्ञात आरोपी तेथे आले व त्यांनी तोंड दाबून मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांनी खिशातील पाच हजार रुपयांचा मोबाईल फोन व रोख सातशे असा एकूण 5 हजार 700 रुपयांचा एवज चोरून नेला आहे. याचा तपास पोलीस करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.