पुणे : गुलटेकडी येथील ‘दारूवाला एज्युकेशन सोसायटीचे’ क्रिसेंट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील इयत्ता बारावीच्या विज्ञान व वाणिज्य शाखांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. चितलंघ्य प्रथम गोविंद या विद्यार्थ्यांने वाणिज्य शाखेतून 89.08% गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला आहे.
शेख निखत महंमद या विद्यार्थिनीने विज्ञान शाखेतून 84 % गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला तर जत ईशा हिराराम या विद्यार्थिनीने विज्ञान शाखेमधून 83.08% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे.
विज्ञान शाखेतून 33 विद्यार्थी व वाणिज्य शाखेतून 25 विद्यार्थी अशा एकूण 58 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 30 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती महंमदी अब्बास दारूवाला यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. फराह दारूवाला, हिना दारुवाला तसेच पर्यवेक्षक नजीर शेख यांसह सर्व शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.