आंबेठाण -महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथील द्वारका स्कूलने दहावीच्या सीबीएसई बोर्डाच्या 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. संकेत सरदारने 98 टक्के गुण मिळवत स्कूलमध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे.
इंग्रजी, हिंदी, गणित या विषयात त्याने 100 पैकी 99 गुण मिळविले आहेत. तर आर्या गुळवणी (97), रोहन कुप्पीली (94.6) गुण मिळवत अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला आहे. रोहनने गणित विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. पहिले पाच विद्यार्थी 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून यशस्वी झाले आहेत.
शाळेचे संस्थापक हेमंत नाईकनवरे, मुख्याध्यापिका स्वाती आंब्रे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व त्यांना पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालक यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.