पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत चऱ्होली, रावेत, बोऱ्हाडेवस्ती येथील आरक्षित जागांवर सर्वांसाठी घरे संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) या अभियानाचे उद्दिष्ट्ये पूर्ण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने या योजनेंतर्गत आर्थिक दुर्बल घटकातील (इडब्ल्यूएस) नागरिकांसाठी परवडण्या योग्य अशा घरांची निर्मिती केली आहे.
या योजनेची सोडत आज (सोमवार) दुपारी तीन वाजता चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहामध्ये आमदार तथा माजी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार होती. मात्र राष्ट्रवादी- भाजप यांच्या श्रेय लाटण्याच्या स्पर्धेत आजची सोडत रद्द करण्यात आली आहे.