कोरोनाचा कायमचा बंदोबस्त करणारी ‘सुपर लस’ तयार

नवी दिल्ली :  शास्त्रज्ञांनी कोरोना विरोधातील नवीन लसीचा शोध लावला असल्याचा दावा करणारी बातमी एका वेबसाइटवर देण्यात आली आहे.

संबंधित नवी लस कोरोनाचे सर्व प्रकार आणि अवतार आणि भविष्यात उदभवणाऱ्या संभाव्य अवतारांवरही परिणामकारक ठरणार असल्याचे, थोडक्‍यात कोरोनाचा कायमस्वरूपी बंदोबस्त करणारी ठरणार असल्याचे त्या बातमीत म्हटले आहे. त्यामुळेच ही नवीन लस “सुपर लस’ म्हणून ओळखली जाणार आहे.

नावीन्यपूर्ण पध्दतीचा उपयोग करुन लस तयार करण्यात आली आहे. यासाठी यूव्हीए हेल्थचे स्टीव्हन एल. झेचनेर आणि व्हर्जिनिया टेकचे झियांग-जिन मेंग या संशोधकांनी सुपर व्हॅक्‍सिनचा शोध लावला आहे.

कोविड-19च्या सध्याच्या व्हेरियंटवर ही नवीन लस अधिक प्रभावी ठरणारी आहेच. शिवाय कोरोनाच्या कोणत्याही नव्या स्ट्रेनवर रामबाण ठरणार आहे. त्यामुळे ही व्हॅक्‍सिन घेतल्यानंतर कोरोनापासून अधिक सुरक्षा मिळणार आहे, असा दावा करण्यात आला आहे तसेच या लसीचा एकच डोस पुरेसा असेल असेही सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.