धक्कादायक संशोधन! कोरोनातून बरे झाल्यानंतरही होऊ शकतो मृत्यू; ‘या’ प्रकारच्या रुग्णांना सर्वाधिक धोका

नवी दिल्ली  – करोना विषाणूची दुसरी लाट अत्यंत घातक ठरत आहे. विषाणूचा हा नवा अवतार  फुफ्फुसांना थेट संसर्ग करतो. त्यामुळे करोना झाल्याचे उशिरा लक्षात येते. करोना सातत्याने आपले रूप बदलत आहे आणि नवीन रूपामध्ये फुफ्फुसांना पुरेशी हानी झाल्यानंतर लक्षणे दिसू लागतात.

यापूर्वी दिसणाऱ्या लक्षणांपेक्षा ही लक्षणे थोडी वेगळी आहेत. या विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर लगेचच श्वसनाचे त्रास जाणवू लागतात तसेच प्रकृती देखील खालावते. करोनाच्या या लाटेत ताप आणि खोकल्याची लक्षणे दिसत नाहीत . तसेच कोरोनाची लागण झालेल्यांपैकी बहुतांश रुग्ण हे किरकोळ लक्षणे असलेले किंवा लक्षणे नसलेले आहेत.

या लाटेतील रुग्णांमध्ये कोरोनातून बरे झाल्यानंतरही लक्षणे दीर्घकाळ राहू शकतात असे संशोधकांनी म्हटले आहे. यामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याचीही भीती असते असा दावाही या संशोधकांनी केला आहे.

त्यांच्या दाव्यानुसार, रुग्णांमध्ये कोरोनातून बरे झाल्यानंतरही लक्षणे दीर्घकाळ राहू शकतात असे संशोधकांनी म्हटले आहे. 87 हजार कोरोना रुग्ण आणि 50 लाख इतर रुग्णांच्या माहितीचा अभ्यास संशोधकांनी केला असून यानंतर हा दावा करण्यात आला आहे.

संशोधकांच्या माहितीनुसार,कोरोनातून बरे झाल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत रुग्ण दगावण्याचा धोका 59 टक्क्यांपेक्षा अधिक असतो. संशोधकांना अभ्यासातून दिसून आलं की 6 महिन्यांत एक हजारांपैकी किमान 8 मृत्यूमुखी पडलेले रुग्ण असे होते ज्यांना दीर्घकाळ कोरोनाची लक्षणे होती. 

या रुग्णांचा मृत्यू कोरोनाशी जो़डून पाहिला जात नाही असं संशोधकांचे म्हणणे आहे. संशोधकांना अभ्यासातून दिसून आलं की 6 महिन्यांत एक हजारांपैकी मृत्यूमुखी पडलेले 29 रुग्ण असे होते जे 30 दिवसांपेक्षा अधिक काळ रुग्णालयात उपचार घेऊन आले होते.

नवीन  लक्षणांची यादी पुढीलप्रमाणे :

1)डोकेदुखी
सातत्याने डोकेदुखी हे करोनाचे नवे लक्षण आहे. जर औषधाचा एक डोस घेऊन बर वाटत नसेल तर ही वेळ आहे डॉक्‍टरांच्या सल्ला घेण्याची.

2) डोळे लाल होणे
डोळे लाल होणे हे करोनाचे नवे लक्षण आहे. अनेकदा यासोबत डोळे सुजल्याचे आढळून आले आहे.

3) अंग दुखी
करोनाचे नवे लक्षण अंगदुखी हे आहे. औषध घेऊनही बरे वाटत नाही विशेषतः सांधे दुखत राहतात.

4) अतिसार
नेहमीपेक्षा जर पोट साफ करायला जास्तवेळा जावे लागत असेल तर तेही करोनाचे लक्षण आहे. यावेळी करोनाबाधितांच्या अतिसाराच्या तक्रारी आहेत.

5) अशक्तपणा
करोनाच्या दुसऱ्या लाटेत सामान्य लक्षणे दिसत आहेत अशक्तपणा हेही लक्षात आहे.अशाक्तपनाने डोळ्यापुढे अंधारी येत असेल तर काळजी घेणे आणि तपासणी घेणे चांगले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.