पुणे :- सहाव्या सिटी प्रीमियर लीग (सीपीएल) ७- अ- साईड फुटबॉल स्पर्धेेत साखळी फेरीत डायमंड डॅगर्स संघाने ७,९ वर्षाखालील गटात सुरेख कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला.
स्पोर्टस फाऊंडेशन पुणे यांच्या मालकीच्या सिटी एफसी पुणे यांच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून मोशी येथील सिटी स्पोर्टस अरेना येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत ७ वर्षाखालील गटात पहिल्या सामन्यात श्रीहान जाधव (२१ मि) याने केलेल्या एक गोलाच्या जोरावर डायमंड डॅगर्स संघाने मॅट्रिक मार्व्हल्स संघाचा १-० असा पराभव केला.
तर दुसऱ्या सामन्यात डायमंड डॅगर्स संघाने कॉन्स्टिलेशन चिताजचा ३-२ असा पराभव केला. विजयी संघाकडून रियांश कदमने (१३, १७ मि.) दोन गोल, तेजस पाटीलने (१९ मि.) एक गोल केला. याचा गटात डायमंड डॅगर्स संघ आदित्य ऑलस्टार्स संघाविरुद्ध अंतिम लढत होणार आहे.
Paris 2024 : ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचा भारताचा मार्ग खडतर; जाणून घ्या नेमकं कारण….
९ वर्षाखालील गटात रुद्र काळभोर (११ मि.), अनुज शिरोटे (२१ मि.)यांनी केलेल्या प्रत्येकी एक गोलाच्या जोरावर डायमंड डॅगर्स संघाने कॉन्स्टिलेशन चिताज संघाचा २-० असा पराभव केला. मॅट्रिक मार्वल्स संघाने कॉन्स्टिलेशन चिताज संघावर २-० असा विजय मिळवला. मॅट्रिक मार्वल्सकडून खेमराज धुमाळ (२० मि.), हर्षद कोठावळे (२४ मि.) यांनी गोल केले. या गटात अंतिम फेरीत डायमंड डॅगर्स संघ मॅट्रिक मार्वल्स संघाशी झुंजणार आहे.