पुणे – इन्स्टिट्युट ऑफ चार्टर अकाऊंटस् ऑफ इंडियाच्या डब्ल्युआयआरसी पुणे शाखा तर्फे आयोजित ११ व्या ‘श्री रामकृष्ण ऑईल मिल्स् करंडक’ सीए क्रिकेट लीग (सीएसीएल) स्पर्धेत रॉयल्स् इलेव्हन, एमएसीए इलेव्हन, टिंबर वुल्व्हज् आणि एएनआरके डायनामोज् या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्धघाटनाचा दिवस गाजवला.
शिंदे हायस्कूल, सहकारनगर येथील मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत कुणाल जामवर याच्या ५८ धावांच्या जोरावर रॉयल्स् संघाने एसपीसीएम स्ट्रायकर्स संघाचा १३ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. आनंद दायमा याचया नाबाद ३३ धावांच्या खेळीमुळे एमएसीए इलेव्हनने एडीएम वॉरीयर्स संघाचा ७ गडी राखून पराभव केला.
संकेत चव्हाण याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर टिंबर वुल्व्हज् संघाने व्हीएसएन सुपरकिंग्ज् संघाचा ६ गडी राखून पराभव करत उद्धघाटनाचा दिवस गाजवला. अर्थव गुजराथी याच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर एएनआरके डायनामोज् संघाने सीए टायटन्स् संघाचा १२ धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली.
#U19WorldCup2024 #INDvIRE | भारताचा सलग दुसरा विजय, आयर्लंडचा 201 धावांनी केला पराभव…
याआधी स्पर्धेचे उद्धघाटन श्री रामकृष्ण ऑईल मिल्स्चे संचालक आनंद पटेल, घनाशाम पटेल आणि ध्रुव पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डब्ल्युआयआरसीचे माजी उपाध्यक्ष सीए सर्वेश जोशी आणि पुणे शाखेचे अध्यक्ष राजेश अगरवाल, स्पर्धेचे संचालक राजेश मेहता, सचिन पारेख, योगेश पोद्दार, संघाचे खेळाडू आदि उपस्थित होते.