नवी दिल्ली – करोना व्हायरच्या दुसऱ्या लाटेचा धोका अजून सुद्धा संपला नाही असे असताना करोनाच्या दोन नवीन व्हेरिएंटने सर्वांची चिंता वाढविली आहे. याआधी करोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळून आला आहे. आता करोनाच्या नवीन व्हेरिएंटने तोंड वर काढले आहे. कप्पा व्हेरिएंट म्हणून करोनाचे नवीन रुप बाहेर आले आहे.
कप्पा व्हेरिएंट संक्रमणाचे दोन रुग्ण उत्तर प्रदेश मधील संतकबीरनगर जिल्ह्यात मिळाले आहेत. येथिल स्थानिक प्रशासनाकडून संक्रमन झालेल्या रुग्णांची ट्रवल्स हिस्ट्री तपासण्याचे काम चालू केले आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंट पेक्षा कप्पा व्हेरिएंट अधिक घातक असल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. करोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंट मुळे देशात करोनाची दुसरी लाट आली आहे. या दृष्टिकोनातून करोना साथीच्या तिसर्या लाटेला रोखण्यासाठी सरकार पुरेशी पावले उचलत आहे.
जाणून घ्या कप्पा व्हेरिएंटबद्दल
आपल्या सर्वांना माहित आहे की, जागतिक आरोग्य संघटनेने करोना विषाणूच्या स्ट्रेनचे नाव ग्रीक वर्णमालाच्या लेबलांवरुन (Greek alphabetical labels) दिले गेले आहे. यानुसार भारतात करोना व्हायरसच्या व्हेरिएंट स्ट्रेनचे नाव डेल्टा आणि कप्पा ठेवण्यात आले आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट अन्य् व्हेरिएंटच्या तुलनेत 60 टक्के अधिक संक्रमण करणारा आहे. डेल्टा प्लसला बी.1.617.2 स्ट्रेन बोलले जाते तर, कप्पा व्हेरिएंटला बी.1.617.1 बोलले जाते.
कप्पा व्हेरिएंटची लक्षणे
खोकला, ताप, अतिसार, चव गमावणे, घसा खवखवणे, श्वास लागणे यासारख्या लक्षणे देखील कप्पा व्हेरिएंटने संक्रमित झालेल्यांमध्ये दिसून येतात. त्यामुळे आपल्याला किरकोळ लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कप्पा व्हेरिएंट प्रकाराबद्दल बरेच संशोधन चालू आहे. या संशोधनामधून कप्पा व्हेरिएंटची अन्य् माहिती समोर येऊ शकते.