शिकागो – येथे शाळांमध्ये अजब आदेश काढण्यात आला आहे. मुलांना मोफत कंडोम देण्याच्या या आदेशामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. हा आदेश शिकागो पब्लिक स्कुल बोर्ड ऑफ एजुकेशन यांनी काढला आहे.
या आदेशानुसार शाळांना वर्ग पाचवी ते त्यापेक्षा पुढील वर्गातील मुलांना मोफत कंडोम देण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. हा आदेश काढण्यामागचे कारण शिकागो पब्लिक स्कुल बोर्ड ऑफ एजुकेशनने सांगितले आहे की,’मुलांमधील लैंगिक आजार, एचआयव्ही संसर्ग आणि अनावश्यक गर्भधारणा रोखण्यासाठी हा आदेश काढण्यात आला आहे. सध्या कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने हा निर्णय अंमलात आणण्यात आला नाही.’ असेही त्यांनी म्हंटले आहे.
मात्र या आदेशावर नागरिकांनी विरोध दर्शवला असून या आदेशाबाबत सोशलवरही संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर या आदेशाबाबत एका युजरने संताप व्यक्त करत हा निर्णय मानसिक आजारपणाचे लक्षण असल्याचे म्हटले.
तर एका व्यक्तीने या आदेशाचा विरोध करत ट्विट केले आहे की,“शिकागो एलिमेंट्री शाळांमध्ये मोफत कंडोमची व्यवस्था करेल. मात्र, गँग्जच्या विरोधात कारवाईबाबत काय मत आहे? कारण, मुले शाळांमध्ये गोळीबाराच्या भयाशिवाय मुक्तपणे शाळेत जाऊ शकतील.” दरम्यान, या नवीन शालेय धोरणावर पालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली.