IMP NEWS | येत्या 28 तारखेपासून 18 वर्षांवरील लसीकरणासाठी नाव नोंदणी करता येणार, जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली – 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सकारने केली आहे. त्यानुसार लसीकरणासाठी येत्या 28 तारखेपासून नाव नोंदणी करता येणार आहे. ही नोंदणी केंद्र सरकारच्या कोविन अॅप आणि cowin.gov.in या संकेतस्थळावर करता येणार आहे.

लसीकरण नावनोंदणीसाठी फोटो आयडी प्रुफ, फोटो आयडी नंबर, लिंग, जन्मतारिख ही माहिती भरणे आवश्यक आहे. ही सर्व माहिती भरल्यानंतर लसीकरण नोंदणी होईल.

दरम्यान, याआधी लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाईन वर्कर्स आणि 60 वर्षांवरील नागरिकांचा समावेश होता. तर दुसऱ्या टप्प्यात 45 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

8.5 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात येणार –

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सीरम इन्स्टिटियूटचे सीईओ अदर पुनावाला यांची बैठक पार पडली आहे. 18 ते 45 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्याबाबत चर्चा झाली आहे. राज्य सरकारने महाराष्ट्रात व्यापक लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार, या कार्यक्रमात जवळपास तब्बल 8.5 कोटी लाकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. लसीची कमतरता भासू नये यासाठी परदेशातून करोनाच्या लसी आयात करण्यात येणार आहेत. तसेच राज्यातील सर्व खात्यांचा फंड हा केवळ करोना लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी वापरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

लसीकरणामुळे करोना हद्दपार होईल –

गेल्या 24 तासात देशात 3 लाख 14 हजार 835 नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2104 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, तज्ज्ञांच्या माहितीनुसार, लसीकरणामुळे करोनाला हद्दपार करण्यास मदत होईल. लसीची परीणामकारकता 80 ते 90 टक्के असल्याचे सांगण्यात येते. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर जरी करोना संसर्ग झाला तरी होणारा त्रास हा खुप कमी असतो असे संशोधनातून समोर आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.