नवी दिल्ली – ( covid fatalities in India ) – देशात गेल्या 24 तासांत 4529 कोविडग्रस्त रुग्ण दगावले असून एका दिवसांत इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण दगावण्याचा हा एक उच्चांक आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत 2 लाख 67 हजार नवीन कोविडग्रस्त रुग्ण आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या निवेदनात देण्यात आली आहे.
आज झालेल्या मृत्यूमुळे देशातील एकूण कोविडग्रस्तांच्या मृतांची संख्या आता 2 लाख 83 हजार 248 इतकी झाली आहे. तर कोविडग्रस्त एकूण रुग्णांची संख्या 2 कोटी 54 लाख 96 हजार 330 इतकी झाली आहे.
सध्या देशातील एकूण सक्रिय बाधितांची संख्या आता 32 लाख 26 हजार 719 इतकी झाली आहे. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या 12.66 टक्के इतके आहे. करोनाग्रस्त रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच सध्याचा रिकव्हरी रेट आता 86.23 टक्के इतका झाला आहे. ( covid fatalities in India )
दरम्यान, गेल्या 24 तासांत जे 4529 रुग्ण दगावले त्यातील 1291 रुग्ण महाराष्ट्रातील आहेत, कर्नाटकातील 525, तमिळनाडूतील 364, दिल्लीतील 265, उत्तर प्रदेशातील 255, पंजाबातील 231, तर बिहारमधील 111 रुग्ण या अवधीत दगावले आहेत.
दरम्यान, गेल्या आठवडाभरात भारतात 23 लाख 87 हजार 663 नवीन केसेस आढळून आल्या आहेत हे प्रमाण मागील आठवड्यापेक्षा तेरा टक्क्यांनी कमी आहे परंतु एकूण संख्या मात्र अद्यापही जगातील सर्वाधिक संख्या आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
भारताच्या खालोखाल कोविड रुग्णांच्या बाबतीत या आठवड्यात ब्राझील, अमेरिका, अर्जेंटिना आणि कोलंबिया या प्रांतांचे क्रमांक लागतात. तथापि, अमेरिकेतील प्रमाण 21 टक्क्यांनी घटले असून ब्राझील आणि अर्जेंटिनाचे प्रमाण अनुक्रमे 3 टक्के आणि 8 टक्क्यांनी वाढले आहे. ( covid fatalities in India )
या आठवड्याच्या कालावधीत भारतात सर्वाधिक म्हणजे 27 हजार 922 रुग्ण दगावले असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.