मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. प्रथम पती राज कुंद्रा याला अश्लील व्हिडिओ बनवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती आणि आता अभिनेत्रीची आई सुनंदा शेट्टीविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले आहे.
सुनंदा यांच्यावर 21 लाखांचे कर्ज न फेडल्याचा आरोप आहे. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट (अंधेरी कोर्ट) आरआर खान यांनी यापूर्वी शिल्पा, तिची आई सुनंदा आणि बहीण शमिता यांना फसवणूक केल्याप्रकरणी समन्स बजावले होते.
या समन्सला शिल्पाच्या कुटुंबीयांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले होते. सोमवारी सत्र न्यायाधीश ए. झेड खान यांनी शिल्पा आणि शमिता यांच्या विरोधात दंडाधिकाऱ्यांच्या आदेशाला स्थगिती दिली परंतु त्यांच्या आईला दिलासा दिला नाही.