मुंबई – अभिनेत्री कंगना राणावत आणि तिच्या बहिणीने सोशल मिडीयावर द्वेषमुलक संदेश प्रसारीत केल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश येथील कोर्टाने पोलिसांना दिला होता.
त्याच्या प्रगतीचा अहवाल सादर करा अशी सुचना कोर्टाने पोलिसांना केली आहे.गेल्या वर्षी ऑक्टोबर मध्ये कोर्टाने कंगनाच्या सोशल मिडीया पोस्टची चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले होते. तो अहवाल 5 डिसेंबर पर्यंत सादर करायचा होता.
पण त्या अवधीत हा अहवाल सादर करण्यास पोलिसांना यश आले नाही. नंतर ही मुदत 5 जानेवारी पर्यंत वाढवण्यात आली. पण तरीही हा अहवाल पोलिस सादर करू शकले नाहीत. त्यामुळे सरकारने या तपासाची माहितीचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
या प्रकरणाची पुढील सुनावणी 4 मार्चला होणार आहे. कंगना आणि तिच्या बहिणीने एका विशिष्ट समाजाला लक्ष्य करून त्यांना दहशतवादी असे संबोधले होते.