नवी दिल्ली – देशात प्राणघातक करोना व्हायरसचा उद्रेक सुरूच आहे. असे असताना आता देशात ओमायक्रॉन प्रकारांची प्रकरणेही वाढत आहेत. गेल्या 24 तासांत देशात करोना विषाणूचे 7 हजार 145 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, 289 लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत देशात करोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची 113 प्रकरणे समोर आली आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात सक्रिय रुग्णांची संख्या 84 हजार 565 झाली आहे. त्याचबरोबर या करोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 4 लाख 77 हजार 158 झाली आहे. आकडेवारीनुसार, काल 8 हजार 706 जण करोनामुक्त झाले असून त्यांंना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशभरात आतापर्यंत 3 कोटी 41 लाख 71 हजार 471 लोक करोनामुक्त झाले आहेत.