नवी दिल्ली – देशभरात चाचणी सुविधांच्या महत्त्वपूर्ण सुधारणेमुळे गेल्या 24 तासांत 2 लाखाहून अधिक नमुने तपासण्यात आले जो आजवरचा उच्चांक आहे. काल 2,15,195 नमुने तपासण्यात आले होते, त्यातील 1,71,587 नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासण्यात आले तर खाजगी प्रयोगशाळेत 43,608 नमुने तपासले गेले. आत्तापर्यंत तपासण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 73,52,911 वर पोहोचली आहे. यामुळे खाजगी प्रयोगशाळांनीही प्रति दिन सर्वाधिक नमुने तपासण्याचा उच्चांक नोंदवला आहे.
कोविड-19 चाचणी करण्यासाठी निदान प्रयोगशाळांच्या वाढत्या प्रमाणाचे द्योतक म्हणजे भारतात आता 1000 प्रयोगशाळा आहेत. यात शासकीय क्षेत्रात 730 आणि 270 खाजगी प्रयोगशाळांचा समावेश आहे.
कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दरही दररोज वाढत आहे. गेल्या 24 तासात कोविड-19 चे 10,495 रुग्ण बरे झाले. आत्तापर्यंत एकूण 2,58,684 रुग्ण बरे झाले आहेत. कोविड-19 चे रुग्ण बरे होण्याचा दर 56.71% वर पोहोचला आहे. सध्या 1,83,022 सक्रिय रुग्ण असून ते सर्व वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत.