पुणे – हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याला घरोघरी गुढी पूजन करण्यात आले. साखरेच्या गाठी, आंब्याची पाने, लिंबाचा पाला, वस्त्र यांसह गुढी उत्साहात उभारण्यात आली आहे.
दरम्यान, ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर आलेला यंदाचा गुढीपाडवा सर्वांनी घरात थांबूनच साजरा करावा. कुणीही घराबाहेर पडू नये. रस्त्यावर येऊ नये. गर्दी टाळावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे