नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने पूर्णपणे हैदोस घातला आहे. त्यातच देशात नुकतीच पाच राज्यांची विधानसभा निवडणूक पार पडली आहे. त्यानंतर कोरोनाचे वाढते संकट पाहता पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांनी लॉकडाऊनचे आदेश जारी केले आहेत.
West Bengal announces restrictions, to be imposed from 6 am on May 16 to 6 pm on May 30
Schools, govt/pvt offices, malls, cinema halls, restaurants, gyms to be closed; metro, intra-state transportation suspended; movement of pvt vehicles prohibited. Emergency services exempted. pic.twitter.com/bitlbn3jQ3
— ANI (@ANI) May 15, 2021
All offices including govt & private to remain closed except emergency services from tomorrow. Intra state bus services, metro, ferry service, gyms, cinema halls, salons, swimming pools to remain closed. Retail shops to be open from 7-10 am: West Bengal Chief Secretary#COVID19 pic.twitter.com/eATsRxb9no
— ANI (@ANI) May 15, 2021
बंगालमध्ये 16 मे ते 30 मे पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहेत. खासगी ऑफिस, शाळा-कॉलेज बंद राहणार आहेत. फळे, भाज्या आणि किराना दुकाने सकाळी 7 ते 10 वाजेपर्यंतच सुरु राहणार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये 15 दिवसांचा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत लोकांच्या बाहेर पडण्यावर बंदी आहे. पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे संक्रमण वेगाने पसरू लागले आहे.
Parks, zoo & sanctuaries to also remain closed. All outdoor activities, except emergency needs, will be prohibited from 9 pm till 5 am from tomorrow in the wake of surge in #COVID19 cases: West Bengal Chief Secretary Alapan Bandyopadhyay
— ANI (@ANI) May 15, 2021
राज्य सरकारच्या बुलेटीननुसार शुक्रवारी बंगालमध्ये 20,846 नवे रुग्ण सापडले आहेत. 136 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. संक्रमण दर हा 30 टक्क्यांच्या आसपास आहे. जेव्हा बंगालमध्ये निवडणुकीची घोषणा झाली होती, तेव्हा हाच दर 1 टक्क्यांपेक्षाही कमी होता. सध्या बंगालमध्ये 1,31,792 रुग्ण उपचार घेत आहेत.