मार्केट यार्डातील शिवनेरी रस्ता १ जूनपर्यंत बंद!

पुणे : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील गर्दी रोखण्यासाठी शिवनेरी रस्ता (वखार महामंडळ चौक ते उत्सव हॉटेल) वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. शेतीमालवगळता अन्य वाहनांसाठी शिवनेरी रस्ता बंद राहणार आहे.

मार्केट यार्डात घाऊक खरेदीदारांना प्रवेश देण्यात येणार आहे. केळी बाजाराच्या प्रवेशद्वारातून वाहनांना प्रवेश देण्यात येणार असून मुख्य प्रवेशद्वारातून वाहने उजवीकडे वळून वखार महामंडळ चौक तसेच डावीकडे वळून उत्सव हॉटेल चौकाकडे जातील.

मार्केट यार्डातील गर्दी रोखण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. मार्केट यार्डात किरकोळ खरेदीदारांना प्रवेश नाकारण्यात आला आहे.

करोनाच्या संसर्गामुळे प्रशासनाने कठोर निर्बंधात वाढ केल्यानंतर पुढील आदेशापर्यंत शिवनेरी रस्ता एक जूनपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी कळविले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.