भोंदूबाबाचा पर्दाफाश! नागीण डान्स करून करत होता करोनावर उपचार

नागपूर  : भारतात कोरोनाची दुसरी लाट सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. देशातील प्रत्येक राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. दरम्यान, या कोरोनाला रोखण्यासाठी डॉक्टर्स दिवसरात्र एक करून रुग्णांची सेवा करत आहे.

मात्र काही दिवसांपासून कोरोनाला पळवून लावण्यासाठी आणि प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी अजब  गजब  प्रयोग करण्यात येत आहे.  आपल्या दैवी शक्तीने कोरोनासारखा आजार क्षणार्धात पळवून लावणाऱ्या ढोंगी बाबाचे कारस्थान नागपूर पोलिसांनी  पोलिसांच्या अचानक झालेल्या उपस्थितीने त्याचा दैवी चमत्कार दूर पळून गेला.

पी टी आय  वृत्त माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूरमध्ये  कोरोना दूर करण्याचा दावा शुभम तायडे नावाचा हा बाबा करत असून लोकांना लुबाडत होता. अंगामध्ये चक्क नागराज अवतरतात अशी थाप मारून तो लोकांना मूर्ख बनवत होता. बाबा दैवी शक्तीने पैशाचा पाऊस पाडतो, सट्ट्याचा नंबर देतो, गुप्तधन शोधतो, आजार दूर करतो, भक्तांच्या घरातील भानगडी दूर करतो व स्वप्नात येऊन समस्यांचे निवारण करतो, असा दावा बाबाचे भक्त करत होते.  मात्र नागपूर येथील स्थानिक पोलिसांनी तसेच अंनिसने बाबाच्या घरी पोहचून या भोंदूबाबा अटक केली.

या विषयी स्थानिक पोलिसांनी सांगितले की, हा भोंदूबाबाचा पंचशीलनगर येथील स्वत:च्या घरी दर गुरुवारी दरबार थाटत होता. यावेळी आम्ही रात्री ९ वाजता बाबाच्या दरबारात धाड टाकली.  यावेळी तेथे ५० च्या वर भक्तमंडळी गर्दी करून होते. यावेळी बाबाच्या अंगात शेषनाग संचारल्याने तो जमिनीवर सापासारखा  फुसफुस करत होता. मात्र पोलीस दिसताच या  भोंदूबाबाचा  दैवी चमत्कार दूर पळून गेला. या  भोंदूबाबाला  महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अघोरी प्रथा २०१३ नुसार अटक करण्यात आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.