वडगाव रासाईत 42 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
मांडवगण फराटा- वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील 42 वर्षीय करोनाबाधित पुरुषाचा उपचारादरम्यान पुणे येथील हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे, अशी माहिती मांडवगण फराटा आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. मंजुषा सातपुते-इसवे यांनी दिली.
वडगाव रासाई येथील 42 वर्षीय व्यक्तीचा दि. 17 ऑगस्टला करोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतू उपचारदरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याने रविवारी (दि. 30) रात्री सातच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला आहे. शिरूरच्या पूर्व भागात करोनाचा दिवसेंदिवस कहर सुरुच आहे. आजपर्यंत 84 रुण आढळले आहेत. धुमाळवाडी (शिरसगाव काटा) व मांडवगण फराटा येथे प्रत्येकी एक असे दोन रुग्ण आढळले आहेत.