वॉशिंग्टन- करोनाने थेट आता व्हाईट हाऊस मध्ये प्रवेश केला आहे, तेथील कर्मचारीवर्गापैकी एकाला या रोगाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हा कर्मचारी अमेरिकेचे उपाध्यक्ष माईक पेन्स यांच्या कर्मचाऱ्यौपंकी आहे. अमेरिकन अध्यक्षांच्या प्रासादात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच या रोगाची बाधा होण्याचा हा पहिला प्रकार आहे.
ज्या कर्मचाऱ्याला या विषाणुंची बाधा झाली आहे त्याच्या संपर्कात अध्यक्ष ट्रम्प किंवा उपाध्यक्ष पेन्स यांच्यापैकी कोणीही आलेले नाही असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले आहे. मागच्या आठवड्यात खुद्द अध्यक्ष ट्रम्प यांची करोना चाचणी झाली आहे. त्यात त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. या प्रकारानंतर व्हाईट हाऊस मध्ये येणाऱ्या प्रत्येकाची कसून चाचणी घेतली जात असून त्यासाठी स्वतंत्र वैद्यकीय यंत्रणा तिथे कार्यान्वित करण्यात आलीा आहे.