बिजींग- चीन मधे लागोपाठ तिसरा दिवस असा उजाडला आहे की त्या संपुर्ण दिवसात स्थानिक राहिवाशांपैकी कोणालाही करोनाची बाधा झाल्याचे आढळून आलेले नाही. हे एक सुचिन्ह मानले जात आहे. बुधवार, गुरूवार आणि शुक्रवार अशा तीन दिवसांत चीनच्या मुख्य भूमीत करोनाचा एकही नवीन रूग्ण आढळून आलेला नाही अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य आयुक्तांनी दिली आहे.
मात्र शुक्रवारी बाधितांपैकी सात जणांचे बळी वुहान मध्ये गेले आहेत. मात्र जे हजारो करोना बाधित त्या देशांमध्ये रूग्णालयांमध्ये उपचार घेत होते त्यांच्यापैकी तब्बल 71 हजार 740 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र आता चीन मध्ये एक नवीन अशी समस्या उद्भवली आहे की त्यांचे जगभरातील नागरीक आता मोठ्या प्रमाणावर मायदेशी परतत असून त्यांच्यापैकी अनेकांना या विषाणुंची बाधा झाल्याचे लक्षात येत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी नवीन उपाययोजना करणे ही एक मोठी समस्या आहे.