इस्लामाबाद – पाकिस्तानात करोनामुळे तिसरा बळी गेला असून त्या देशातील करोना बाधित रूग्णांची संख्या 510 इतकी झाली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान इम्रान खान यांनी देशातील जनतेला पुढील किमान 45 दिवस स्वयं वैद्यकीय बंदिवासात राहण्याची सुचना केली आहे.
शुक्रवारी पाकिस्तानात जो करोनाचा तिसरा बळी गेला आहे, तो सिंध प्रांतातील असून या 77 वर्षीय इसमाला रक्तदाब आणि मधुमेहाचाही विकार होंता. सिंधच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, या प्रांतात करोना बाधितांची एकूण संख्या आता 249 इतकी झाली आहे. तर खैबर पख्तुनवा प्रांतात 23 जण या रोगाच्या प्रभावाखाली आले आहेत. पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील रूग्णांची संख्या 96 इतकी झाली आहे. पाक व्याप्त काश्मीरातही एक रूग्ण आढळून आला असून या रोगाच्या रूग्णांचे प्रमाण जवळपास सर्वच प्रांतात पसरले असल्याने पाकिस्तानची चिंता वाढली आहे.