CoronaNews : लक्षणे असताना आईने केले बाळाला स्तनपान; नवजात बालकाचा करोनाने मृत्यू

सूरत – देशात करोना संसर्ग थैमान घालत आहे. करोना रुग्णांसह आता मृतांची संख्याही झपाट्याने वाढत असून यामध्ये ज्येष्ठ नागरिकांसह बालकांचा देखील जीव जात आहे. गुजरातमध्ये स्थिती अधिकच भयावह असून येथे १४ दिवसांच्या नवजात बाळाचा करोनामुळं मृत्यू झाला आहे.

नवजात बालकाला जन्माच्या दोन दिवसांनी करोनाची लागण झाली होती. बालकाला वाचविण्यासाठी प्लाझ्मा देण्यात आला होता. मात्र बालकाचा जीव वाचविण्यात अपयश आलं. बालकाच्या आईला आधीच करोनाची लक्षणे दिसत होती. मात्र त्यांनी ही बाब कोणालाही सांगितली नाही. एवढच नाही तर करोनाचे लक्षणे असताना महिलेने आपल्या बाळाला स्तनपान केले. त्याचा परिणाम बाळावर झाला.

बाळाला करोनाची लागण झाल्यानंतर वराछा येथील डायमंड रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे बाळाला प्लाझ्मा देण्यात आला. मात्र उपचारादरम्यान बाळाचा मृत्यू झाला. करोनाची दुसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरत असल्याचं बोललं जात आहे.  सूरतमध्ये आतापर्यंत तीन बालकांचा करोनामुळं मृत्यू झाला आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.