कच्च्या घाणीचे तेल आरोग्यासाठी खरेच फायदेशीर असते का? जाणून घ्या तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे..

सध्या टीव्हीवर विविध प्रकारच्या जाहिरातींचा भडीमार सुरु असलेला दिसून येतो. त्यातही खाद्यपदार्थांच्या बाबतीत तर गोंधळून टाकणाऱ्या अशा या जाहिराती पाहून ग्राहकांचा संभ्रमच वाढलेला दिसतो. आता खाद्य तेलांचेच पहा ना.. काही जण रिफाईंड तेलच आरोग्याला फायदेशीर असल्याचे सांगतात तर काही जण कच्च्या घाणीचे (कोल्ड प्रेस्ड) तेल किंवा क्रूड कंटेंडेड ऑइल आरोग्यासाठी उत्तम असल्याचे ठामपणे सांगतात. खाद्य तेल स्वयंपाकात महत्वाची भूमिका बजावते. विशेषत: भारतीय पदार्थ तेलाशिवाय रुचकर होत नाहीत. मोहरी, तीळ, सूर्यफूल, ऑलिव्ह ऑईल असे वेगवेगळे तेल भारतीय स्वयंपाकघरात वापरले जातात. परंतु आरोग्याचा विचार केला तर जुन्या पद्धतीच्या कच्च्या घाणीच्या तेलाचेच फायदे अधिक दिसून येतात. कसे, ते पाहुयात !

* कच्च्या घाणीचे तेल म्हणजे काय?
वास्तविक, कच्च्या घाणीचे तेल हे आरोग्यासाठी सर्वोत्कृष्ट मानले जाते. कारण त्यात तेल काढण्यासाठी कोणतेही प्रिझर्वेटिव्ह किंवा रसायन वापरले जात नाही. यात, मशीनद्वारे तेल नैसर्गिक पद्धतीने काढले जाते, जे अन्न शुद्ध ठेवते. कच्च्या घाणीचे तेल म्हणजेच क्रूड कंडेन्स्ड ऑइल कमी उष्णतेमध्ये तयार केले जाते, ज्यामुळे त्याचे गुणधर्म टिकून राहतात. आहारतज्ञ देखील आरोग्यासाठी कच्च्या घाणीचे तेल वापरण्याची शिफारस करतात कारण त्यात हेल्दी फॅट्स असतात, ज्यामुळे आपले नुकसान होत नाही.

* आरोग्यासाठी फायदेशीर का?
हे तेल इतर तेलांप्रमाणे ते उष्णतेसाठी उच्च तापमानात ठेवले जात नाही. त्याच वेळी, तेल काढताना अशुद्ध, घातक घटक काढले जातात. तेल रिफाईंड नसल्याने त्याचे पोषक तत्वही टिकून राहतात. यात मिनरल्स, व्हिटॅमिन्स, पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट, ओमेगा -3 फॅटी ऍसिड देखील भरपूर प्रमाणात असतात. आयुर्वेद देखील हेच तेल स्वयंपाकासाठी योग्य मानतो.

* रिफाईंड तेल स्वयंपाकासाठी हानिकारक का आहे?
वास्तविक, ब्लीच आणि केमिकलचे अनेक प्रकार रिफाईंड तेलावर प्रक्रिया करण्यासाठी वापरले जातात. यामुळे तेलात असलेले पोषण, चव, रंग आणि सुगंध निघून जातो. हे तेल दिसायला कदाचित चांगले वाटेल परंतु शरीरासाठी ते पूर्णपणे हानिकारक आहे. अशा परिस्थितीत स्वयंपाक करण्यासाठी कच्च्या घाणीचे तेल वापरणे कधीही चांगले.

* कच्च्या घाणीचे तेलाचे फायदे
हे तेल नैसर्गिकरित्या कोलेस्ट्रॉल आणि चरबी रहित आहे. यात कोणतेही रसायन अथवा प्रिझर्वेटिव्ह नसतात. त्याच वेळी, तेलाची नैसर्गिक चव मिळते. म्हणून त्यात तयार केलेले खाद्य अधिक चवदार आणि पौष्टिक ठरते. याचे फायदे पुढीलप्रमाणे.

. हृदय निरोगी ठेवते
कच्च्या घाणीचे तेल कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करते. त्यात उपस्थित असलेल्या अल्फा लिनोलेनिक ऍसिडमुळे रक्तामध्ये जमा होणारे प्लेटलेट कमी होते. यामुळे केवळ हृदयविकाराचा धोका कमी होत नाही तर बरेच आजार टळतात.

. जळजळ कमी करते
अँटीऑक्सिडेंट आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असलेले हे तेल शरीरात जळजळ कमी करण्याचे सामर्थ्य देते. इंफ्लेमेशनमुळे शरीराला सूज येते.

. त्रिदोष दूर करते
संशोधनानुसार,कच्च्या घाणीचे तेल शरीराचे तीन मुख्य दोष वात, पित्त आणि कफ संतुलित करण्यास देखील फायदेशीर मानले जाते. हे तेल त्वचेसाठीही अगदी निरोगी आणि शुद्ध आहे. यात उपकारक जिवाणू असतात. त्यामुळे शरीरावर मालिश केल्याने त्रिदोष दूर होते. विशेषत: वातच्या समस्यांमध्ये हे तेल खूप फायदेशीर मानले जाते.

. मधुमेहावर नियंत्रण ठेवते
रासायनिक तेले मधुमेहाच्या रुग्णांमध्ये साखरेची पातळी वाढवतात, परंतु कच्च्या घाणीचे तेल आपल्यासाठी योग्य असेल. हे रक्तातील साखर आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते, जे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे.

. रोग प्रतिकारशक्ती वाढवते
अँटीऑक्सिडंट्स, अँटी बॅक्टेरियल, अँटी इंफ्लेमेशन, ओमेगा -3 फॅटी ऍसिड्स आणि व्हिटॅमिन ई ने समृद्ध हे तेल प्रतिकारशक्ती वाढविण्यास देखील मदत करते. हे शरीरास अनेक विकारांविरूद्ध लढण्यास मदत करते.

. वजन कमी होते
बहुतेकदा लोक वजन कमी करण्यासाठी तेलाचे सेवन करणे थांबवतात, परंतु कच्च्या घाणीचे तेल वजन कमी करण्यासाठीही सर्वोत्कृष्ट मानले जाते. कच्च्या घाणीची पोषक तत्त्वे यकृतात जाऊन चरबीचे प्रमाण कमी करतात. त्याच वेळी, त्याचे रेचक गुणधर्म पचण्यास मदत करतात. अशा परिस्थितीत आपण वजन कमी करण्यासाठी निश्चिन्त होऊन हे तेल वापरू शकता.

यावरून हे स्पष्ट होते की कच्च्या घाणीचे तेलच आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र तळण्याचे पदार्थ बनविताना तेल जास्त गरम केल्यास हे तेलदेखील आरोग्यासाठी हानिकारक होऊ शकते. म्हणून योग्य तापमानात अन्न शिजवणे केव्हाही चांगले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.