वृत्तसंस्था – इराकमध्ये एका रुग्णालयातील करोना वॉर्डला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषन आगीमध्ये तब्बल ५८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नसीरिय शहरातील हे रुग्णालय असून ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि मदत व बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेतली.
#Nasiriyah moments ago: pic.twitter.com/SCusoo1jZu
— Yousif al-Hashimi | يوسف الهاشمي (@YousifHashimi) July 12, 2021
या आगीमुळे 67 हून अधिकजण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे.
‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या भीषण आगीतून आत्तापर्यंत 16 जणांची सुटका करण्यात आली. यामध्ये होरपळून मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्यास अडचण येत आहेत. करोना वॉर्डमध्ये ही आग लागल्याची माहिती तेथील स्थानिक आरोग्य अधिकारी यांनी माहिती दिली आहे.
ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही आग लागली असून आगीचा भडका जोरात उडाला होता. यामध्ये काही करोनाबाधित होरपळून मृत पावले. अग्निशमन दलाच्या जवानांना आणि मदत व बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांना आगीच्या ठिकाणी दाखल होण्यास प्रयन्त करावे लागले. अशी माहिती एका आरोग्य कर्मचाऱ्याने दिली आहे.