वॉशिंग्टन – परिणामकारक लसीशिवाय करोना विषाणू नष्ट होऊन जाईल असे चमत्कारिक वक्तव्य अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. तसेच अमेरिकेत येत्या काळात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या 95 हजार किंवा त्यापेक्षाही पुढे जाईल. असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले.
खरंतर सध्या सगळे जग करोनाचा सामना करते आहे. जगभरातल्या 200 देशांवर करोना नावाचे संकट कोसळले आहे. जगभरात अडीच लाख लोकांचा या रोगामुळे मृत्यूही झाला आहे. त्यात सर्वाधिक संख्या अमेरिकेतील आहे. अशा परिस्थितीत आता डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही लसीशिवाय करोना निघून जाईल असे वक्तव्य केले आहे. “द गार्डियन’ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.