पुणे – शहरात करोनाने दररोज सरासरी 30 हून अधिक बाधितांचा मृत्यू होत आहे. गुरुवारी (दि. 23) 36 जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. परंतु यातील काही मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत. त्यामुळे शहरातील मृतांची एकूण संख्या आता 1,104 झाली आहे.
याच संदर्भात पुण्यातील करोना पॉझिटिव्ह रुग्णांबाबत सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून तो पुण्याच्या ससून रुग्णालयातील असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र ससून रुग्णालयातील व्हायरल होणारा हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याचे तथ्य शोधल्यास याबाबत सत्य समोर आले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडियो पुण्यातील ससून रुग्णालयाचा नसून हा व्हिडियो बिहारच्या पाटणामधील एका रुग्णालयातील असल्याचे समोर आले आहे.
#Covid False video about conditions of hospitals in Blore circulated on social media..Case registered in Cybercrime PS..While Govt, society at large fighting the pandemic..Some r creating/forwarding messages/videos which has potential to create panic in society..REFRAIN FROM IT..
— Sandeep Patil IPS (@ips_patil) July 19, 2020
एका वृत्तवाहिनीने 18 जुलैला याच व्हिडियो बाबत वृत्त दिले होते की,’बिहारमधील पाटण्यातील महावीर रिसर्च सेंटरमध्ये बाह्य रूग्ण विभागात झालेली ही गर्दी असल्याचे म्हटले आहे. यामुळे डॉक्टर, नर्स आणि रुग्णांना धोका निर्माण झाल्याचे म्हटले आहे.’ दरम्यान सोशल मीडियावर वेगाने वायरल होणारा हा व्हिडियो पुण्यातील ससून रूग्णालयाचा नसून पाटण्यातील महावीर कॅन्सर रिसर्च सेंटरचा हा व्हिडिओ आहे.
याबाबत ट्विटरवर बंगळूरूचे सहपोलीस आयुक्त संदीप पाटील यांनीही हा व्हिडिओ तेथील कोविड रुग्णालयाचा नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी ट्विट केले आहे की, कोविड-19 रूग्णालयातील व्हिडिओ म्हणून असत्य माहिती पसरविल्याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी एकाला अटक केली आहे.’हा तोच व्हिडिओ आहे जो पुण्यातील ससून रुग्णालयातील म्हणून व्हायरल होत आहे, असे दिसून आले.हा व्हिडियो अनेक शहरातील नावाने सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.