मुंबई – करोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आला आहे. सोबतच राज्यातील अनेक हॉटस्पॉट सील करण्यात आले आहेत. अशातच मुंबईमधील मानखुर्दमध्ये भाजीविक्रेता आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.
माहितीनुसार, मुंबईमधील मानखुर्दमध्ये एक महिला कंटेनमेंट क्षेत्रात भाजीव्रिकी करत होती. मात्र, पोलिसांनी त्यांना परवानगी नाकारली. यामुळे महिला आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी महिलेविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
#WATCH Mumbai: A scuffle broke out between a hawker and police personnel yesterday after she was not allowed to sell vegetables in a containment area in Mankhurd. A case has been registered in the matter by police. (Source – Amateur video) #Maharashtra #CoronaLockdown pic.twitter.com/NGhaUypxIx
— ANI (@ANI) April 18, 2020
दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 2 हजारहून अधिक करोनाबाधित आढळले आहेत. त्यामुळे करोनाचा संसर्ग झालेल्या रूग्णांची महाराष्ट्रातील संख्या देशात सर्वांधिक ठरली आहे.