न्युयाॅर्क- डिसेंबरमध्ये अमेरिकेत लस उपलब्ध होईल असा विश्वास फायजर कंपनीने व्यक्त केला आहे. फायजरने विकसित केलेल्या लशीची चाचणी सुरू आहे. सध्या सगळ्या जगाला जो महत्वाचा प्रश्न पडला आहे. तो म्हणजे लस कधी येणार? यातच फायजर या कंपनीने हा दिलासादायक दावा केला आहे.
या वर्षाच्या अखेरपर्यंत करोनाला अटकाव करणारी लस उपलब्ध होईल. फायजर कंपनी बायोएनटेकसोबत (BioNTech) संयुक्तीरीत्या लस विकसित करत आहे. न्यूयॉर्कमधील फायजर आणि जर्मनीची बायोएनटेक कंपनीने विकसित केलेली लस सध्या लस चाचणीत आघाडीवर आहे. त्याशिवाय, मॉडर्ना इंक आणि एस्ट्राजेनका पीएलसी या लशींही स्पर्धेत असून त्यांची चाचणी सुरू आहे, असं फायजर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अल्बर्ट बौर्ला यांनी सांगितले
ऑक्टोबर अखेरपर्यंत प्रायोगिक लशीची परिणामकता जाणून घेण्यासाठी ६० टक्के संधी आहे. अमेरिकेचे अन्न आणि औषध प्रशासनाच्या निर्णयावरही लशीचे भवितव्य अवलंबून आहे, असंही ते म्हणाले.
दरम्यान, ऑक्सफर्ड आणि सिरम इंस्टिट्युटच्या लशीच्या चाचण्या पुण्यात सुरु झाल्या होत्या मात्र ज्या व्यक्तीच्या शरीरावर लशीची चाचणी करण्यात आली होती. त्यांची प्रकृतीत बदल जाणवल्याने या चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या मात्र दोन दिवसातच या चाचणीला पून्हा सुरुवात करण्यात आली आहे.