वाल्हे (पुणे) – पुरंदर तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडेवारीचा आलेख कमी होत नसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी (दि. 26) तालुक्यात 57 जणांचे अहवाल पॉझिटव्ह आले आहेत.
सासवड येथील शासकीय लॅबमधी 136 संशयितांपैकी सासवड (34), पिसर्वे, जेजुरी (प्रत्येकी 2), हिवरे, सोनेरी, टेकवडी, बोपगाव, भिवडी, दिवे, भोसलेवाडी, वाळुंज, कोथळे, नायगाव, पानवडी येथील (प्रत्येकी 1) असे 50 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून एक रूग्ण तालुक्या बाहेरील हडपसर येथील आहे.
जेजुरी येथील शासकीय लॅबमधील 34 संशयितांपैकी जेजुरी, नीरा (प्रत्येकी 3), कोळविहिरे, कुंभारकरवाडी (प्रत्येकी 1) असे 8 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.