शिक्रापूर –शिक्रापूर (ता. शिरूर) परिसरात दररोज मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असताना २६ मार्च रोजी फक्त शिक्रापूर गावा मध्ये तब्बल एकतीस कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये तब्बल ६८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी शिक्रापूर येथे एकतीस, सणसवाडी येथे बारा, तळेगाव ढमढेरे येथे अकरा, निमगाव म्हाळुंगी येथे दोन, कोंढापुरी येथे चार, कोरेगाव भीमा येथे दोन, पारोडी येथे चार, विठ्ठलवाडी येथे एक तर डिंग्रजवाडी येथे एक असे तब्बल ६८ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याची माहिती तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी दिली आहे.
तर शिक्रापूर येथे दररोज सरासरी दहा ते पंधरा रुग्ण नव्याने कोरोना बाधित होत असताना आज पुन्हा एकाच दिवसात पुन्हा शिक्रापूर परिसरात अनेक कोरोना बाधित रुग्णांची भर पडल्याने येथील नागरिकांची चिंता वाढली असून भीतीचे वातावरणही निर्माण झाले आहे. परिसरातील नागरिकांनी योग्यती खबरदारी घेऊन गर्दी टाळण्याचे व मास्क वापरण्याचे आवाहन तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा घोरपडे यांनी केले आहे.