हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली हिच्यावर अनेकजण जीव ओवळतात. जगभर तिचे कोट्यवधी चाहते आहे. यातच काही दिवसांपूर्वी एका तरूणीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. आपण हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली प्रमाणे दिसावं यासाठी या मुलीने चेहऱ्यावर 50 वेळा सर्जरी केल्या होत्या. पण झालं उलटच अँजेलिना जोली प्रमाणे सुंदर दिसण्यापेक्षा ती खूपच वाईट दिसू लागली. ही तरूणी सहर तबर या नावाने प्रसिध्द आहे. आता या तरूणीला कोरोना झाल्याचे वृत्त समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सहर तबर या नावाने प्रसिध्द असलेल्या २२ वर्षीय तरूणीचे खरं नाव फतेमिह खिशवंद असे आहे. काही वर्षांपूर्वी अँजेलिना जोली प्रमाणे दिसण्यासाठी सर्जरी केल्या होत्या. परिणामी ती खूपच वाईट दिसू लागली. सर्जरीमुळे तीचा चेहरा पुरता बिघडून गेला. २०१९ ऑक्टोबरमध्ये तीला निंदा आणि हिंसा भडकवण्यासाठी अटक करण्यात आले होते.
ऑक्टोबरमध्ये तीला अटक करून तेहरानमधील एका कारागृहात ठेवण्यात आले होते. त्या कारागृहत तीला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र तीला जामीन देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे तीची सुटका झाली नसली तरी कारागृह प्रशानतर्फे रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीला सध्या व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले सहर कोरोनामुळे मृत्यूशी झुंज देत आहे.