मुंबई- बॉलिवुडमधील आघाडीचा निर्माता दिग्दर्शक करण जोहर याच्या 50 व्या वाढदिवसाची पार्टी त्यात हजेरी लावलेल्या स्टार मंडळींमुळे चर्चेची ठरली होती. मात्र आता हीच पार्टी एका वेगळ्या कारणामुळे या सगळ्यांसाठी डोकेदुखीची ठरली आहे. त्यात कारण या पार्टीत उपस्थित राहीलेल्या जवळपास 55 जणांना करोनाची लागण झाली आहे.
पार्टीत जवळपास सगळे सेलिब्रिटी सहभागी झाले होते. मात्र त्यानंतर सर्वप्रथम कार्तिक आर्यन आणि कतरिना कैफ यांचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आता अन्य जणांनाही लागण झाल्याची माहिती पुढे येते आहे.
कियारा आडवाणी आणि कार्तिक आर्यन यांच्या मुख्य भूमिका असलेला भूल भुलैय्या 2 अलिकडेच प्रदर्शित झाला. त्याआधी कार्तिक आणि कियाराने चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. कार्तिक आर्यनने नुकतीच करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती.