देहरादून – अनियंत्रित बस दरीत कोसळून यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर डामटाजवळ भीषण अपघात झाला आहे. बसमध्ये 40 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे. आतापर्यंत 16 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. माहिती मिळताच पोलीस आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी पोहोचली असून बचावकार्य सुरूच आहे. बस हरिद्वारहून निघाली होती. सर्व प्रवासी मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.