बेल्हे : बोरी बुद्रुक (ता.जुन्नर) येथे ५२ वर्षीय पुरुषाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आला आहे, यामुळे बोरी परिसर बफर झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. ही व्यक्ती एप्रिल महिन्यात मुंबई वरून गावी आली होती. सदर व्यक्तीला निमोनियाचा त्रास होत असल्याने १२ जून रोजी पुण्याला हलवले होते.
या कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आई व पत्नी अशा २ व्यक्तींना लेण्याद्री कोविड सेंटर मध्ये तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे. यामुळे आता जुन्नर तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या ३४ वर पोहचली असून सध्या ऍक्टिव्ह रुग्ण ३ आहेत. अशी माहिती गावचे तलाठी राजू बडे व जुन्नर चे तहसीलदार हनुमंत कोळेकर यांनी दिली.