शिक्रापूर (प्रतिनिधी): शिक्रापूर ता. शिरूर येथील मलठण फाटा परिसरात एकामागे एक असे तीन रुग्ण आढळून आले. हडपसर येथील एका बँकेत काम करणारा बँक कामगार कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला असताना सलग तीन दिवस दररोज एक एक रुग्ण आढळून येत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथील मलठण फाटा परिसरात राहणारा आणि रांजणगाव गणपती येथील नामांकित कंपनीत नोकरीला असणाऱ्या कंपनी कामगाराला कोरोनाची बाधा झाल्याचे चार दिवसांपूर्वी समोर आले होते, त्यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने सदर कामगाराच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्यात आली असताना त्या कामगाराच्या आठ वर्षाच्या मुलाला कोरोनाची लगन झाल्याचे ३० जून रोजी समोर आले होते.
त्यांनतर हडपसर येथील कंपनीमध्ये कामाला असलेल्या शिक्रापूर येथील कामगाराला १ जुलै रोजी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यांनतर आज पुन्हा सदर सर्वप्रथम ज्या कंपनीमधील कामगाराला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते त्याच कंपनीतील कामगार बाधित आढळून आले. सदर कामगारच्या सोबत त्याच कंपनीत कामाला जाणाऱ्या व त्याच्याच घराशेजारी राहणाऱ्या एका कंपनी कामगाराला पुन्हा आज दोन जुलै रोजी कोरोनाची लागण झाल्याचे सदर कंपनीने केलेल्या तपासणीत समोर आले आहे.
शिक्रापूर येथील सदर कंपनी कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या विभागाचे आरोग्य पर्यवेक्षक जालिंदर मारणे, आरोग्य सेवक एस. एस. चोपडा, शिक्रापूर ग्रामपंचायत कर्मचारी यांसह आदींनी सदर रुग्णाच्या घरा जवळील सर्व परिसरात ग्रामपंचायतच्या वतीने औषध फवारणी करत निर्जंतुकीकरण केले आहे, तर सदर कंपनी कर्मचाऱ्याच्या संपर्कात असलेल्या त्याच्या पत्नी व दोन मुलांचे स्वब तपासणीसाठी घेतले आहे. तसेच त्या कामगाराच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांची माहित संकलित करण्याचे काम आरोग्य विभागाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे. तर काही दिवस कोरोना पासून मुक्ती मिळाल्याने शिक्रापूर व परिसरातील नागरिक समाधानी असताना आता पुन्हा एकामागून एक कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने शिक्रापूर सह परिसर हादरून गेला आहे.