करोनावर मात केलेल्या व्यक्तीची आत्महत्या

दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील घटना

पुणे: दौंड तालुक्यातील बोरीपार्धी येथील करोनावर उपचार घेतलेल्या व्यक्तीने रेल्वेखाली आत्महत्या करून आपले जीवन संपविल्याची घटना बोरीपार्धी (ता.दौंड) येथे गुरूवारी पहाटे घडली आहे.

सदर इसमाचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे त्यांचे नातेवाईक सांगत आहेत. दरम्यान, सोनवणे यांच्या अहवालाबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने रूग्णालयातून माहिती घेण्यात येत आहे.

सादर इसम पिंपरी-चिंचवड परिसरात एका खाद्यतेल कंपनीचे सेल्समन म्हणून काम करीत होते. करोनामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने ते काही दिवस पिंपरी येथे मुक्कामाला होते. आजारी पडल्याने ते घरी आले.

केडगावातील खासगी डॅाक्टरांकडे त्यांनी दहा दिवसांपूर्वी तपासणी केली. डॅाक्टरांना करोनाची लक्षणे दिसल्याने त्यांनी त्यास सरकारी दवाखान्यात उपचार घेण्याचा सल्ला दिला.
सरकारी दवाखान्यात त्यांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले.

त्याचा अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने ते पिंपरी येथे वायसीएम हॅास्पिटलमध्ये उपचार घेत होते. सोनवणे यांची बुधवारी (दि 1) पुन्हा कोरोना चाचणी घेण्यात आली. अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले, असे त्यांचे नातेवाईक सांगत आहेत.

काल रात्री ते बोरीपार्धीतील आपल्या घरी आले. गुरूवारी पहाटे त्यांनी बोरीपार्धीतील रेल्वेगेटच्या पूर्व बाजूला रेल्वेखाली आत्महत्या केली. या घटनेमुळे बोरीपार्धी-केडगाव परिसरात खळबळ उडाली आहे. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय कापरे आणि हवालदार जितेंद्र पानसरे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.