पुणे -आठवड्यातील सर्व दिवस आता लस मिळेल. शनिवार आणि रविवारी लसीकरण सुरू ठेवण्यासाठी सूचना केल्या आहेत. त्यानुसार सध्या ज्येष्ठांना सुरू असलेला तिसरा डोस मिळण्यास सुलभ होईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. महापालिका क्षेत्रात 15 ते 18 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवावा.
औद्योगिक अस्थापनांनी कामगारांना लसीचे दोन्ही डोस देण्याविषयी सूचना देण्याचे निर्देश पवार यांनी दिले. ते पुढे म्हणाले, करोना संख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. सर्व बेड तयार आहेत पण रुग्ण ऍडमिट नाहीत.
सगळे हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध आहेत. जम्बो कोविड सेंटरसुद्धा तयार केले आहे, मात्र सुरू केले नाही. काही खासगी रुग्णालयांच्या तक्रारी आल्या असून त्याबाबत प्रशासन त्या रुग्णालयांशी बोलून तोडगा काढलेला आहे. रुग्णांना त्रास होणार नाही, याबाबत काळजी घेत असल्याचे पवार यांनी सांगितले.