ठाणे – ठाणे शहरात शुक्रवारी करोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. कोविडचा प्रादुर्भाव उद्भवल्यापासून प्रथमच हे घडले आहे अशी माहिती ठाण्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
तथापि काल ठाण्यात कोविडचे एकूण 209 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे येथील एकूण कोविड रूग्णांची संख्या 5 लाख 65 हजार 575 इतकी झाली आहे. तर एकूण मृतांची संख्या 11516 इतकी झाली आहे. शेजारच्या पालघर जिल्ह्यात अजूनही कोविड रूग्ण आढळण्याचे प्रकार सुरूच आहेत.
त्या जिल्ह्यात आत्तापर्यंत 1 लाख 37 हजार 974 जणांना कोविडची बाधा झाली असून त्या जिल्ह्यातील कोविड मृतांची संख्या आता 3282 इतकी झाली आहे. ठाणे आणि पालघर मध्ये करोनाच्या नियंत्रणासाठी सरकारी यंत्रणांना बरीच धावाधाव करावी लागली आहे.