#Corona | ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून भारताला आर्थिक मदत

मेलबर्न – भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे भारतात मोठे संकट उभारले असून अनेक देश मदतीसाठी पुढे येत आहेत. विशेष म्हणजे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डानेदेखील मदतीचा हात दिला आहे.

करोनाविरोधातील लढ्याला बळकटी देण्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन आणि यूनिसेफच्या सहकार्यातून भारतासाठी आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी प्रारंभिक रूपात 50 हजार डॉलरची मदत जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती ऑस्ट्रेलिया बोर्डाने ट्‌विट करत दिली आहे. तसेच भारताच्या मदतीसाठी ऑस्ट्रेलियातील नागरिकांनाही मदतीचे आवाहन केले आहे. 

ऑस्ट्रेलिया बोर्डाचे सीईओ निक हॉकले म्हणाले, करोनाच्या दुसऱ्या लाटेत आम्ही सर्वजण भारतासोबत आहोत. आमच्याकडून शक्‍य होईल तितकी मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. तसेच भारतातील नागरिकांच्या दुःखात सहभागी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.