सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात करोनाचा विस्फोट झाला असून, एकाच दिवसांत तब्बल एक हजार 16 नवे रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाकडे काल (रविवार, दि. 11) रात्री 12 वाजेपर्यंत आलेल्या माहितीनुसार दहा करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सोमवारी सांगितले.
जिल्ह्यात जवळपास आठ महिन्यांनी एकाच दिवशी हजाराहून अधिक लोक बाधित आढळले आहेत. राज्यात करोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने शासन आठ ते चौदा दिवस पूर्ण लॉकडाऊनचा विचार करत आहे. या आधीच्या शासन आदेशानुसार, 30 एप्रिलपर्यंत “ब्रेक दि चेन’ अंतर्गत दर आठवड्याच्या शनिवारी व रविवारी टाळेबंदी (वीकेंड लॉकडाऊन) करण्यात येत आहे.
त्यातील पहिला मिनी लॉकडाऊन काल (दि. 11) व शनिवारी (दि. 10) झाला. त्यानंतरही बाधितांची व करोनाबळींची संख्या वाढल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे; परंतु नागरिकांना करोनाचे फारसे गांभीर्य नसल्याचे सोमवारी बाजारपेठेत झालेल्या गर्दीवरून स्पष्ट झाले आहे.
सातारा शहरात गुरुवार पेठ दहा, शाहूपुरी, मंगळवार पेठ प्रत्येकी सात, सोमवार पेठ पाच, प्रतापगंज पेठ, गोडोली प्रत्येकी चार, सदरबझार, माची पेठ, शनिवार पेठ प्रत्येकी तीन, यादोगोपाळ पेठ, रविवार पेठ, दौलतनगर, गोडोली, पिलेश्वरीनगर प्रत्येकी दोन, रामाचा गोट, सदाशिव पेठ, बुधवार पेठ, मल्हार पेठ, मोरे कॉलनी, गडकर आळी, गेंडामाळ, गोळीबार मैदान, पिरवाडी, शाहूनगर प्रत्येकी एक, इतरत्र 45,
तालुक्यात कोडोली सात, आरे पाच, एमआयडीसी, लिंब, वर्णे प्रत्येकी चार, नागठाणे, हमजाबाद, संगमनगर, करंजे प्रत्येकी तीन, चंदननगर, कारंडवाडी, खावली, खोकडवाडी, सोनवडी, नागेवाडी प्रत्येकी दोन, देगाव, तारगाव, मांडवे, वाढे, निगडी, नेले-किडगाव, म्हसवे, कोंडवे, सैदापूर, दत्तनगर, वेणेगाव, संभाजीनगर, चिंचणी, कण्हेर, मुंढेवाडी, खेड, तासगाव, चिंचणेर निंब, वेळेकामथी, राजापुरी, कारी, सोनगाव, कुस बुद्रुक, कृष्णानगर, निनाम पाडळी, विकासनगर, मांडवे, आरळे, वेचले, कृष्णानगर, कामेरी, शिवथर, जांब, धनगरवाडी, अपशिंगे, बोरेगाव, नवलेवाडी, वडूथ, कटापूर, अंगापूर, कळंबे, पानमळेवाडी प्रत्येकी एक,
कराड शहरात सोमवार पेठ पाच, कार्वे नाका, विद्यानगर प्रत्येकी तीन, रविवार पेठ, गुरुवार पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, कोल्हापूर नाका प्रत्येकी एक, इतरत्र नऊ, तालुक्यात बनवडी सात, उंब्रज सहा, कोरेगाव, पाली प्रत्येकी चार, मलकापूर, काले, वाठार प्रत्येकी तीन, कोयना वसाहत, गोरेवाडी, तांबवे, सुपने, ओगलेवाडी, येळगाव, मसूर, कोळेवाडी, सैदापूर प्रत्येकी दोन, आगाशिवनगर, काळगाव, पोतले, गोळेश्वर, वडगाव हवेली, शेणोली, विजयनगर, वारुंजी, कोपर्डे, तळबीड, वाण्याचीवाडी, नडशी, सावडे, हजारमाची, करवडी, अडसुळे, इंदोली, कुसूर, अणे, कोळे, विंग, येणके, पळेवाडी, विहापूर, वाघेरी प्रत्येकी एक,
पाटण तालुक्यात तारळे चार, पाटण, नांदोली, मारुल हवेली, माजगाव, मल्हारपेठ प्रत्येकी तीन, ढोरोशी, बांबवडे प्रत्येकी दोन, कुंभारगाव, गुजरवाडी, सुरुल, काळगाव, चाफळ, जाधववाडी, बाबरवाडी, पापर्डे, केळवली, सोनाईचीवाडी, गुढे प्रत्येकी एक,
फलटण शहरात रविवार पेठ, लक्ष्मीनगर प्रत्येकी आठ, बुधवार पेठ पाच, मलठण तीन, सगुणामातानगर दोन, मंगळवार पेठ, कसबा पेठ, काळुबाईनगर, विद्यानगर, संजीवराजेनगर प्रत्येकी एक, इतरत्र 27, तालुक्यात कोळकी 14, मठाचीवाडी, विडणी प्रत्येकी सात, सांगवी, गुणवरे प्रत्येकी पाच, जिंती, सस्तेवाडी, जाधववाडी प्रत्येकी चार, बरड, पिंप्रद, साखरवाडी, अलगुडेवाडी, दुधेबावी, चव्हाणवाडी प्रत्येकी तीन, मिरढे, काळज, पाडेगाव, निंभोरे, निंबळक, ठाकुरकी प्रत्येकी दोन, वडजल, हणमंतवाडी, राजाळे, नांदल, फरांदवाडी, आदर्की, कुरोली खुर्द, तांबवे, निरगुडी, विंचुर्णी, सोनवडी बुद्रुक, वेळोशी, दालवडी, चौधरवाडी, ढवळेवाडी, तरडगाव, खामगाव, सोमंथळी, साठे, राजुरी प्रत्येकी एक,
खटाव तालुक्यात पुसेगाव 16, वडूज 13, पुसेसावळी सात, खटाव, बुध प्रत्येकी पाच, खातगुण, बोंबाळे, मायणी, सिद्धेश्वर कुरोली, कातरखटाव, औंध प्रत्येकी चार, जायगाव, काटेवाडी, भोसरे, येरळवाडी प्रत्येकी तीन, नेर, एनकूळ, डांभेवाडी प्रत्येकी दोन, निढळ, फडतरवाडी, वर्धनगड, बनपुरी, अंबवडे, औतवाडी, खरशिंगे, उंचीठाणे, राहटणी, डाळमोडी, ललगुण, राजापुरी, रणसिंगवाडी, गोपुज, नांदोशी, गोरेगाव वांगी, पळशी, चितळी प्रत्येकी एक,
माण तालुक्यात म्हसवड 11, भालवडी दहा, बोथे चार, गोडसेवाडी, राणंद, पर्यंती प्रत्येकी दोन, गोंदवले बुद्रुक, मार्डी, मोही, दहिवडी, कोळेवाडी, वडजल, बनगरवाडी, जाधववाडी, लोधवडे प्रत्येकी एक, कोरेगाव तालुक्यात एकंबे 41, कोरेगाव 12, रहिमतपूर नऊ, पिंपोडे बुद्रुक आठ, सोनके सहा, नलवडेवाडी, चौधरवाडी प्रत्येकी चार, अंबवडे, वाठार स्टेशन प्रत्येकी तीन, वाठार किरोली, त्रिपुटी, नांदगिरी, देऊर, जांब प्रत्येकी दोन, शिरंबे, रणदुल्लाबाद, नांदवळ, साप, वेळू, ल्हासुर्णे, हिवरे, सुलतानवाडी, जरेवाडी, पवारवाडी, बिचुकले, खामकरवाडी, कण्हेरखेड, पळशी, चिलेवाडी, तारगाव, धामणेर, सातारारोड, कुमठे, पिंपोडे खुर्द प्रत्येकी एक,
खंडाळा तालुक्यात शिरवळ 15, खंडाळा, लोणंद प्रत्येकी आठ, शिंदेवाडी पाच, विंग चार, अंदोरी तीन, बावकलवाडी, पाडेगाव, धनगरवाडी, वडगाव, मोरवे, गुठाळे प्रत्येकी एक, वाई शहरात इतरत्र 11, रविवार पेठ सहा, गंगापुरी पाच, धर्मपुरी, रामडोह आळी प्रत्येकी दोन, गणपती आळी, नावेचीवाडी, सिद्धनाथवाडी, दत्तनगर, धोम कॉलनी, सह्याद्रीनगर प्रत्येकी एक, तालुक्यात वेळे पाच, अभेपुरी तीन, पसरणी, गुळुंब प्रत्येकी दोन, बावधन, शेंदुरजणे, वेलंग, वाघजवाडी, किकली, अनवडी, वहागाव, केंजळ, भुईंज प्रत्येकी एक,
महाबळेश्वर तालुक्यात महाबळेश्वर शहर 27, काळमगाव 19, पाचगणी 15, तायघाट पाच, पार दोन, माचुतर, राजापुरी, मुरा, भिलार प्रत्येकी एक, जावळी तालुक्यात कुडाळ तीन, म्हसवे दोन, आलेवाडी, सानपाने, हातगेघर, मेढा, वारोशी, तेटली, भुतेघर, वजरोशी प्रत्येकी एक, इतर 49, इतर राज्ये व जिल्ह्यांमधील राजस्थान दोन, पुणे सात, मुंबई दोन, सांगली दोन, नागपूर एक, असे 1016 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
चोवीस तासांत दहा करोनाबळी
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरू असताना, दौंड, जि. पुणे येथील 65 वर्षीय पुरुष, बावधन, ता. वाई येथील 60 वर्षीय पुरुष, वाईतील 40 वर्षीय पुरुष, राजापूर, ता. खटाव येथील 78 वर्षीय महिला, सातऱ्यीाल 82 वर्षीय पुरुष, मेढा, ता. जावळी येथील 77 वर्षीय पुरुष आणि खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना, बुधवार पेठ, ता. फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, बोडकेवाडी, ता. फलटण येथील 59 वर्षीय पुरुष, तांबवे, ता. कराड येथील 45 वर्षीय पुरुष, घनसोळी, जि. ठाण येथील 56 वर्षीय पुरुष, अशा दहा कोविडबाधितांचा मृत्यू झाला.