नवी दिल्ली : तामिळनाडूत लष्कराचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले असून कोईम्बतूर आणि सुलूर यादरम्यान हे हेलिकॉप्टर कोसळले आहे. हेलिकॉप्टरमध्ये संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत देखील हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. या दुर्घटनेत रावत यांना गंभीर दुखापत झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातच आता रावत यांचं जैविक युद्धासंदर्भात व्यक्त केलेली शक्यता समोर आली आहे.
करोना महामारीचे जैविक युद्धात रूपांतर होऊ शकते. अशा परिस्थितीत सर्व देशांनी करोनाचा सामना करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे, अस चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांनी म्हटलं होतं.
बिम्सटेक सदस्य देशांचा समावेश असलेल्या आपत्ती व्यवस्थापन अभ्यासाच्या कर्टेन रेजर कार्यक्रमात, भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी देखील करोनाचा नवीन व्हेरिएंट आणि संसर्गाच्या प्रकरणांमध्ये होणारी वाढ, यावरून सतर्क केले होते.