Corona : रात्रभर १० रुग्णालयं फिरूनही मिळाला नाही बेड, अखेर गाठलं मुख्यमंत्र्यांचं घर; पण….

बंगळुरू – देशात करोना महामारीने धुमाकूळ घातला आहे. अनेक राज्यात ऑक्सिजन अभावी अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. सरकार देखील या स्थितीसमोर हतबल झाल्याचं चित्र आहे. यासंदर्भात कर्नाटकमधून धक्कादायक वृत्त आले असून येथील एका महिलेने आपल्या पतीला ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी थेट मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांच निवसस्थानच गाठलं. मात्र महिला आपल्या पतीला वाचवू शकली नाही. यामुळे कर्नाटक सरकार आरोग्य सेवेविषयी करत असलेला दावा किती खरा आहे, हे स्पष्ट झालं आहे.

बंगळुरूमध्ये एका करोना रूग्णाचे कुटुंबिय रुग्णाला बेड मिळावा यासाठी 10 हून अधिक रुग्णालयांत फिरून आले. मात्र सगळीकडून त्यांना निराशाच आली. अखेरीस निराश झालेल्या कुटुंबाने मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच निवसस्थान गाठलं. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर रुग्णासाठी बेडची व्यवस्था केली पण वाटेतच रुग्णाचा मृत्यू झाला.

बंगळुरू बाहेरील रामोहल्ली येथे राहणारे सतीश (वय 45) याची प्रकृती चिंताजनक झाली. त्यांची पत्नी मंजुलता यांनी सतीश यांना घेऊन रुग्णालय गाठले. पण बेड नसल्याचं सांगत त्यांना परत पाठवण्यात आले. मंजुलता यांनी सांगितलं की, ”दहा रुग्णालयांमध्ये विचारणा केल्यानंतरही बेड मिळाला नाही. त्यावेळी आम्हाला एकच मार्ग दिसला. म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना विनंती करण्यासाठी त्यांच्या घरा बाहेर गेलो.”

मुख्यंमंत्र्याच्या कावेरी निवासस्थानासमोर पोलीस दलाने आम्हाला अडवले. त्यावेळी मंजुलता म्हणाल्या की,  ‘माझ्या पतीच्या उपचाराचा सर्व खर्च मी उचलणार आहे. माझ्यासाठी फक्त एका आयसीयू बेडची व्यवस्था करा जेणेकरून माझ्या पतीवर उपचार केले जाऊ शकतात. त्यानंतर एमएस रामा हॉस्पिटलमध्ये बेडची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर ही महिला पतीसमवेत रुग्णालयाच्या दिशेने निघाली. मात्र वाटेतच तिच्या पतीचा मृत्यू झाला.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.