पुणे – करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी केलेल्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने भुसार बाजार आवारातील सहा व्यापार्यावर कारवाई केली. त्यांच्याकडून जीएसटीसह ३५ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
बाजार आवारात नियमावली लागू करण्यात आली आहे. खरेदीदारांची गर्दी होऊ न,ये म्हणून सूचना देण्यात आल्या आहेत. बाजार आवाराच्या कामकाजाची वेळ कमी करण्यात आली आहे.
भुसार बाजार परिसरातील बालाजी ट्रेडर्स, न्यू बालाजी ट्रेडिंग कंपनी, ओसिया ट्रेडिंग कंपनी, बजरंग ट्रेडिंग कंपनी, सिंघल ट्र्रेंडग कंपनी, बालाजी ट्रेंडिग कंपनी या व्यापारी पेढींविरोधात बाजार समितीच्या पथकाने कारवाई केली. त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला,अशी माहिती पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली. करोना परिस्थितीचे गांभीर्य पाहून नियमांचे पालन करण्याचे आवाहनही गरड यांनी केले आहे.