नवी दिल्ली – देशभरात पुन्हा करोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत कोविड-19 चे 6,155 नवे रुग्ण आढळले आहेत. यासह करोनाचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 5.63 टक्क्यांवर पोहोचला आहे, तर साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 3.47 टक्क्यांवर पोहोचला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आता देशात करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 31,194 वर पोहोचली आहे. दुसरीकडे, शुक्रवारी 6,050 आणि गुरुवारी 5,335 रुग्णांची नोंद झाली होती. 6 महिन्यांनंतर देशात एकाच दिवसात इतके रुग्ण आढळले आहे.
करोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट मोडमध्ये आले आहे. यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी शुक्रवारी राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत मनसुख त्यांनी करोनाच्या व्यवस्थापनासाठी सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आणि राज्यांसह करोना लसीकरणासंदर्भात आढावा घेतला होता.