Odisha Train Accident – ओडिशातील बालासोर येथील बहनगा बाजार स्टेशनजवळ घडलेला अपघात हृदय हेलावणारा आहे. कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी यांच्यात धडक झाल्याची बातमी आली होती. यानंतर हावडा एक्स्प्रेसच्या धडकेचे प्रकरणही समोर आले आणि सायंकाळी उशिरापर्यंत तीन गाड्यांमध्ये धडक झाल्याचे स्पष्ट झाले.
अपघाताची फोटो समोर आली आहेत, ती भयावह आहेत, त्यातून मृतांचा आकडा शेकडोच्या पुढे जाईल, अशी भीती व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार, आधी ३०, नंतर ५०, नंतर ७० मृत्यू, मध्यरात्री मृत्यूची संख्या १२० वर गेली आणि काही वेळातच २०७ वरून २८० पर्यंत वाढ झाली. आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार 900 लोक जखमी झाले आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री सचिन प्रदीप जेना यांनी ही माहिती दिली.
#WATCH | Aerial visuals from ANI’s drone camera show the extent of damage at the spot of the #BalasoreTrainAccident in Odisha. pic.twitter.com/8rf5E6qbQV
— ANI (@ANI) June 3, 2023
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर केला आहे
मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शुक्रवारी रेल्वे अपघाताबाबत मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार 3 जून रोजी राज्यात एक दिवसाचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे 3 जून रोजी संपूर्ण राज्यात कोणताही सण साजरा केला जाणार नाही. ओडिशाच्या माहिती आणि जनसंपर्क विभागाने ही माहिती दिली आहे.